Skip links

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सईद अजमलची निवृत्ती


लाहोर : पाकिस्तानचा फिरकीपटू गोलंदाज सईद अजमलने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याला गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल केल्यानंतर पाकिस्तानकडून खेळण्याची फारशी संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याने अखेर निवृत्तीचा निर्णय घेतला.

अजमल पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या टी-२० मालिकेत अखेरचा सामना खेळणार आहे. आता संघावर कोणत्याही परिस्थितीत ओझे होण्याची इच्छा नाही. शिवाय निवड समितीत संघातील माझ्या निवडीवरुन काही वाद होण्यापूर्वीच मी हा कठोर निर्णय घेत असल्याचे अजमलने निवृत्तीची घोषणा करताना सांगितले.

२०११ ते २०१४या काळात पाकिस्तानसाठी सईद अजमलने मॅच विनर म्हणून भूमिका निभावली. तो या दरम्यानच गोलंदाजांच्या आयसीसी वन डे रँकिंगमध्येही अव्वल स्थानावर कायम होता. पाकिस्तानने २००९ सालचा टी-२० विश्वचषक त्याच्या जबरदस्त गोलंदाजीनेमुळेच जिंकला होता.

Web Title: Saeed Ajmal's retirement from international cricket