Skip links

आता बिझिनेस क्लासमधून प्रवास करणार टीम इंडियाचे खेळाडू


मुंबई : आता इकॉनॉमी क्लासऐवजी बिझनेस क्लासमध्ये भारतीय संघाचे खेळाडू प्रवास करतील. खेळाडूंनी बीसीसीआयकडे या संदर्भात मागणी केली होती. जी मागणी बीसीसीआयने मान्य केली आहे.

इकॉनॉमी क्लासच्या बोर्डिंगच्या आव्हानांबाबत विराट कोहलीसह भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी बोर्डाकडे तक्रार केली होती. आपल्याला गर्दी घेरा घालते अशी तक्रार काही खेळाडूंनी केली होती. तर काही उंच खेळाडूंनी अशी तक्रार केली होती की इकॉनॉमी क्लासमध्ये बसतांना पायाला त्रास होतो. विमानाच्या आसनावर बसून त्यांच्या पायाला खूप त्रास होतो. यापूर्वी फक्त टीमचा कर्णधार आणि प्रशिक्षकाला बिझनेस क्लासमध्ये प्रवास करण्याची सुविधा होती. बीसीसीआयकडे स्वत:चे विमान असले पाहिजे असे बऱ्याच दिवसापूर्वी कपिल देव यांनी म्हटले आहे. कपिल देव यांनी म्हटल्यामुळे क्रिकेटर्सना या विमानामुळे सहजपणे प्रवास करता येईल. ही योजना बोर्डाने पाच वर्षांपूर्वी अंमलात आणली पाहिजे होती. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत बीसीसीआयने खेळाडूंची मागणी मंजुर केली आहे.

Web Title: Now Team India players will travel from the Business Class