Skip links

भारतीय क्रिकेटपटूंची अमेरिकन टीव्हीने उडवली खिल्ली


टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी आपल्या खेळाच्या जोरावर जगभरात आपले असंख्य चाहते बनवले आहेत. पण अमेरिकेतील एका टीव्ही शोमध्ये या खेळाडूंची खिल्ली उडवली गेली आहे. अमेरिकन टीव्ही शो ‘द बिग बँग थ्योरी’ मध्ये, फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विन, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. ही गोष्ट टीम इंडियाच्या चाहत्यांच्या पचनी पडली नाही.


या मालिकेतील ११ व्या सीझनमध्ये भारतीय खगोलशास्त्रज्ञ राजेश कोठारापाली (राज) यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता कुणाल नय्यरने आपला एक मित्र हॉवर्ड वोलोविट्ससोबत मिळून या तीन भारतीय खेळाडूंची खिल्ली उडवली आहे. या मालिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की अमेरिकेतील रहिवासी राज आपल्या परदेशी मित्राला क्रिकेट सामना बघण्यासाठी घेऊन जातो.

सामन्यादरम्यान भारतीय गोलंदाज आर. अश्विनची ओळख करून देताना राज आपल्या मित्र हॉवर्डला म्हणतो की, हा रवीचंद्रन अश्विन आहे. हे आश्चर्यकारक आहे …त्यानंतर तो हार्दिक पांड्याची ओळख भुवनेश्वर म्हणून करून देतो. त्याच वेळी हॉवर्ड एक अमेरिकन आहे आणि त्याच्या निष्कर्षांवरून हे दिसून येते की त्याला या जेंटलमन गेमबद्दल काहीही माहिती नाही. राजने या तीन खेळाडूंचे नाव घेतल्यानंतर हॉवर्ड हा ‘Wooah, wooah, wooah! असे म्हणतो. काही शब्द उरलेल्या लोकांसाठी शिल्लक ठेवा. हॉवर्डच्या उत्तरानंतर बॅकग्राउंड हशाची बरसात होते.

आपणाला सांगू इच्छीतो की या संवादाचा क्रिकेटच्या संदर्भात काही अर्थ नाही आणि हे केवळ भारतीय लोकांची नावे फारच भारी असल्याचे सांगण्यासाठी करण्यात आले आहे. या व्हिडिओवर बऱ्याच लोकांनी आपला अभिप्राय दिला आहे. भारतीय क्रिकेटपटूंची उडवलेल्या खिल्लीमुळे त्यांचे चाहते भलतेच नाराज झाले आहेत.

या व्हिडिओस प्रतिसाद देत, एक युजरने लिहिले, ‘द बिग बँग थ्योरी’मध्ये सत्या नडेलाच्या आवडत्या क्रिकेटपटूचा उल्लेख केला होता. सध्या अमेरिकेमध्ये अश्विनचा बोलबाला असून लवकरच तो जागतिक वास्तु बनला आहे. एकाने लिहिले, या विधानाला काही एक काही अर्थ नाही, परंतु अश्विनला शुभेच्छा आहेत, कारण अमेरिकेत टू आता स्टार बनला आहेस.

Web Title: Indian cricketers make fun by American TV