Skip links

हार्दिक पटेलची आणखी एक ‘तसली’ सीडी व्हायरल


अहमदाबाद : हार्दिक पटेलचा कथित व्हिडीओ गुजरातमध्ये काल समोर आल्यानंतर, मोठा भूकंप राज्याच्या राजकारणात आला. त्यातच २४ तासाच्या आत हार्दिकच्या कथित सेक्सची दुसरी सीडी समोर आली आहे. पाटीदार नेता हार्दिक पटेल या सीडीतील व्हिडीओत असल्याचा दावा केला जात आहे. दोन तरुणी त्याच्यासोबत असल्याचेही दिसत आहे. तो यातील एका तरुणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत असून दरम्यान माझापेपरने या व्हिडीओची पडताळणी केलेली नाही.

काल संध्याकाळी हार्दिक पटेलचा एक कथित सेक्सचा व्हिडीओ समोर आला होता. हार्दिक पटेल ज्यात एका महिलेसोबत असल्याचा दावा केला जात होता. अश्विन सांकडसरिया यांनी हार्दिकची कालची कथित सीडी समोर आणली होती. सांकडसरिया यांनी या व्हिडीओतील व्यक्ती ही हार्दिक पटेल असून, त्याच्यासोबत एक महिलाही असल्याचा दावा केला होता. पण हार्दिक पटेलने हा व्हिडीओ फेक असल्याचे म्हटले होते.

दरम्यान ५ नोव्हेंबरला एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पटेलनेच अशी शंका व्यक्त केली होती की, अशाप्रकारची सीडी येत्या काही दिवसात समोर आणली जाऊ शकते. दरम्यान, गुजरातचे राजकारण हार्दिकच्या कथित सेक्स सीडी प्रकरणानंतर चांगलेच तापले आहे. आणखी एक माहिती या प्रकरणात समोर आली आहे. ज्याने हार्दिकची सीडी समोर आणली, भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्यासोबतचा त्या अश्विन सांकडसरिया या व्यक्तीचा फोटो समोर आल्यामुळे कथित सीडीचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Web Title: Hardik Patel's another 'Sex clip' goes viral