गुजरातमध्ये भाजपची पुन्हा एकदा एकहाती सत्ता येईल – योगी आदित्यनाथ


रायपूर – छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे राजकारणातील अयशस्वी खेळाडू असल्याची खोचक टीका केली. त्यांनी यावेळी गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपचाच विजय होईल, असा दावाही केला आहे.

राजकारणातील राहुल गांधी हे अयशस्वी खेळाडू असून भाजपचाच विजय गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत निश्चित असल्यामुळे गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपची एकहाती सत्ता येईल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला. जेथे स्वत:ला ते फार सक्रीय असल्याचे काँग्रेसचे नेते दाखवतात तेथेच त्यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागतो, असेही ते पुढे म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री रमण सिंह यांची एका कार्यक्रमासाठी छत्तीसगड येथे आलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी भेट घेतली. अनेक योजना आणि दोन्ही राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांबद्दल सिंह यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या भेटीत चर्चा झाली.