Skip links

नोकिया ६ आणि नोकिया ८ वर अमेझॉनची खास कॅशबॅक ऑफर


अमेझॉनचा नोकिया वीक सुरु झाला असून नोकिया ६ आणि नोकिया ८ या स्मार्टफोन्सवर १७ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या वीकमध्ये खास कॅशबॅक ऑफर दिली जाणार आहे. अमेझॉन पे द्वारे अमेझॉन प्राईम मेंबर्सने पेमेंट केल्यास त्यांना अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे.

अमेझॉन पेच्या माध्यमातून जे प्राईम मेंबर्स नोकिया ६ खरेदी करतील त्यांना २५०० रुपये कॅशबॅक मिळेल. तर अमेझॉन पेच्या माध्यमातून इतर ग्राहकांनी पेमेंट केल्यास १५०० रुपये कॅशबॅक दिला जाईल. दुसऱ्या माध्यमातून प्राईम मेंबर्सने पेमेंट केल्यास त्यांना केवळ ५०० रुपये कॅशबॅक मिळेल.

नोकिया ८ साठीही अमेझॉनवर प्राईम मेंबर्सना कॅशबॅक दिला जाणार आहे. अमेझॉन पेच्या माध्यमातून जे प्राईम मेंबर्स हा फोन खरेदी करतील, त्यांना १५०० रुपये कॅशबॅक मिळेल. तुम्हाला नोकिया ६ आणि नोकिया ८ खरेदी करताना एक्स्चेंज ऑफरचाही पर्याय असेल.

१४ हजार ९९९ रुपयांमध्ये नोकिया ६ तुम्हाला खरेदी करता येईल, तर ३६ हजार ९९९ रुपयांमध्ये नोकिया ८ खरेदी करता येईल. या वर्षाच्या सुरुवातीला हे दोन्ही फोन लाँच करण्यात आले होते.

Web Title: Amazon's special cashback offer on Nokia 6 and Nokia 8