सौदीच्या या शहरात चालत नाहीत सौदीचे नियम व कायदे


सौदीच्या भूमीवर मदिरापान, महिला कारचालक, रिकाम्या वेळात बेसबॉलचा खेळ चाललाय अशी कल्पना करणेही अशक्य वाटत असेल पण प्रत्यक्षात मात्र हे सारे शक्य होते ते सौदी सरकारच्या मालकीच्या एका शहरात. या शहराचे नांव आहे अरामको दरहरन कँप. जगातील सर्वात मोठे तेलसाठे असलेले हे ठिकाण असून ही टाऊनशीप आहे. येथे सौदीतील कुठलेच नियम व कायदे लागू नाहीत. अरामको ही जगातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी आहे व कंपनीचे वर्कर व त्यांच्या कुटुंबासाठी ही टाऊनशीप वसविली गेली आहे.


या कॅंपचे कपौंड म्हणजे कॅलिफोर्नियाची प्रतिकृती आहे. येथे हॉलीवूड चित्रपट, पुरूष महिलांनी एकत्र हिंडणे, फिरणे, मदिरापान, अन्य धर्मियांचे सण उत्सव साजरे करणे यावर कोणतीही बंधने नाहीत. येथे महिला सर्रास कार चालविताना दिसतील. येथे महिलांना हिजाबची सक्ती नाही. ५८ किमीच्या परिसरात पसरलेल्या या कॉलनीत नाताळ निमित्ताने घरावर लाईटची सजावट केलेलीही दिसेल. या कॉलनीच्या आतले व बाहेरचे आयुष्य यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे ही कॉलनी म्हणजे सौदीच्या विराट वाळवंटातील ओएसिस मानली जाते.

Leave a Comment