शरीराच्या घामामुळे होणार स्मार्टफोन अनलॉक


स्मार्टफोनसाठी फिंगरप्रिंट, डोळे, फेस रेकग्निशन असे अनेक सुरक्षित अनलॉक करण्याचे तंत्र आले असले तरी ही तंत्रे पूर्णपणे फुलप्रूफ नाहीत असे जाणकारांचे मत आहे. या तंत्रात आता नवीन तंत्राची भर लवकरच पडणार असून फोन अथवा इलेक्ट्राॅनिक वेअरेबल डिव्हायसेस अनलॉक करण्याचे हे तंत्र पूर्णपणे सुरक्षित व युनिक ठरेल असा दावा केला जात आहे. युनिर्व्हसिटी ऑफ अल्बनी मधील प्रोफेसर जॅन हल्मटेक व त्यांच्या टीमने मानवाच्या शरीराला येणार्‍या घामाचा वापर त्यासाठी करण्याचे नवे तंत्र शोधून काढले आहे.

मानवाच्या घामामध्ये अनेक प्रकारची अनिमो अॅसिडस असतात व प्रत्येक व्यक्तीमध्ये ती वेगळी असतात. त्यामुळे या घामाचा वापर आयडेंटिफिकेशनसाठी करता येणार आहे. स्मार्टफोन अथवा वेअरेबल इलेक्ट्राॅनिक्स डिव्हायसेस अनलॉक करण्यासाठी घामातच असलेले कांही खास कण वापरता येणार आहेत. यात अफरातफर करणे शक्य नाही असाही दावा केला जात आहे. तसेच यामुळे स्मार्टफोन हॅक करणेही दुरापास्त बनणार आहे असेही संशोधकांचे म्हणणे आहे. जे अपंग त्यांची बोटे हलवू शकत नाहीत त्यांनाही या तंत्राचा वापर करून त्यांचा स्मार्टफोन व अन्य डिव्हायसेस सुरक्षित ठेवता येणार आहेत. या साठी पासवर्डची गरज नसल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment