अखेर मोटो एक्स ४ भारतात दाखल


दीर्घ काळ टेस्टींग सुरू असलेला मोटोरोलाचा मोटो एक्स फोर भारतीय बाजारात दाखल झाला असून सध्या तो फक्त फ्लिपकार्ट व मोटो हबवर उपलब्ध आहे. हा फोन ३ जीबी व ४ जीबी व्हेरिएंटमध्ये आहे व त्याच्या किंमती अनुक्रमे २०,९९९ व २२,९९९ रूपये आहेत. फ्लिपकार्टवर या फोनवर अनेक ऑफर्स तसेच डिस्काउंट मिळणार आहे. सुपर ब्लॅक व स्टर्लिंग ब्ल्यू अशा दोन रंगात हा फोन उपलब्ध आहे.

या फोनला ५.२ इंची फुल एचडी स्क्रीन कॉर्निला ग्लास प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोरेज तर ४ जीबी रॅमसाठी ६४ जीबी स्टोरेज आहे व मायक्रो कार्डच्या सहाय्याने ते २ टीबी पर्यंत वाढविता येणार आहे. या फोनची खासियत आहे ती ड्युअल रिअर कॅमेरा. यात १२ एमपीचा ऑटो पिक्सल सेंसर कॅमेरा व ८ एमपीचा अल्ट्रा वाईड अँगल १२० डिग्री फिल्ड व्ह्यू कॅमेरा असे दोन रियर कॅमेरे आहेत शिवाय सेल्फीसाठी १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. रियर कॅमेर्‍याने स्लो मोशन व्हिडीओ, शूट इन पॅनोरमा, रेकॉर्डिंग करता येणार आहे.फ्रंट कॅमेरा एलईडी फ्लॅशसह आहे. फोनला ३ हजार एमएएच ची बॅटरी आहे व १५ मिनिटांच्या चार्जिंगवर सहा तासासाठी फोन वापरता येतो.

Leave a Comment