विराटचा सहकारी खेळाडू विकतो आहे सध्या छोले भटुरे !


नवी दिल्ली: क्रिकेट संघात स्थान मिळाळे नाही तर क्रिकेटपटूंवर कोणती वेळ येऊ शकते याचा काही नेम नाही. २००८ साली अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या विश्वविजयी संघात खेळलेल्या एका खेळाडूवर अशीच वाईट वेळ आली आहे. जगण्यासाठी सध्या रस्त्यावर छोले-भटुरे विश्वविजेत्या संघातील या खेळाडूला विकावे लागत आहे.

या खेळाडूचे नाव पेरी गोयल असे असून पेरी गोयलचे छोले भटुरे विकणारे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. २००८मध्ये विराट कोहलीच्या टीम इंडियाने अंडर १९ विश्वचषक जिंकला होता. रवींद्र जाडेजा, मनिष पांडे यासारखे खेळाडू या संघात होते. पेरी गोयलची याच संघात राखीव विकेट कीपर म्हणून निवड झाली होती. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

२००८ हा काळ टीम इंडियासाठी असा होता, महेंद्रसिंह धोनी ज्यावेळी नव्या भारतीय संघाची बांधणी करत होता. विराटच्या टीम इंडियाने त्याच वर्षी अंडर १९ विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे त्या संघातून विराटसह आणखी नवे चेहरे धोनीला मिळाले. पेरी गोयलचे नावही त्यावेळी चर्चेत होते. पण पेरी गोयलला वर्ल्डकपनंतर स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी न करता आल्यामुळे त्याचे नाव मागे पडत गेले. मोठी खेळी पंजाबकडून खेळणाऱ्या पेरी गोयलला करता न आल्याने तो संघातूनच बाहेर पडला.

पेरी गोयलला विश्वचषकाने हिरो बनवले होते. पण क्रिकेटमध्ये सातत्य राखता न आल्यामुळे त्याच्यावर आता छोले भटुरे विकण्याची वेळ आली आहे. सध्या पेरी लुधियाना महापालिकेबाहेर छोले भटुरे विकतो. सोशल मीडियावर त्याची ही कहाणी व्हायरल होत आहे. पण त्याचे फेसबुक अकाऊंटवर पाहिले असता, तो एका कंपनीचा संचालक असल्याचे म्हटले आहे. पण अद्याप याबाबत पुष्टी होऊ शकलेली नाही.