करोडपती बनवेल राष्ट्रपित्याचे हे तिकीट


वेळोवेळी पोस्ट विभागाकडून अनेक प्रसंगाची, प्रसिद्ध व्यक्तींसंदर्भातली खास तिकीटे जारी केली जात असतात. पोस्टांच्या तिकीटांचा संग्रह करणार्‍यांची संख्याही मोठी आहे. हा छंद असलेल्यांना करोडपती बनण्याची संधी आली असून १९४८ साली म.गांधींचे जे १० रूपये मूल्याचे तिकीट जारी केले गेले होते त्या तिकीटाला कोट्यावधींची किमत मिळू शकणार आहे. अर्थात ज्या तिकीटावर सर्व्हीस अशी अक्षरे प्रिंट केली गेली आहेत त्याच तिकीटांना कोट्यावधी रूपयांना मागणी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार स्वातंत्र्यापूर्वी भारतात ब्रिटीश शासनाची तिकीटे वापरात होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने स्वतःची तिकीटे छापली. मात्र ब्रिटीश सरकारला कार्यालयीन बाबी पूर्ण करण्यासाठी तिकीटांची गरज पडली तेव्हा १९४८ साली छापलेली १० रूपये मूल्याची म.गांधीची प्रतिमा असलेली सर्व्हीस तिकीटे दिली गेली. अशी २०० तिकीटे छापली गेली होती त्यातील १०० गर्व्हनर जनरलना दिली गेली, व बाकीची १०० प्रमुख व्यक्ती, अधिकार्‍यांना भेट म्हणून दिली गेली. त्यातील १० तिकीटे खासगी हातात पोहोचली. त्यामुळे ही तिकीटे अत्यंत दुर्मिळ असून यातील एका तिकीटाला फार पूर्वी जिनेव्हा येथील लिलावात २ लाख डॉलर्स म्हणजे ३० लाख रूपये किंमत मिळाली होती. आता या तिकीटांची किंमत कोट्यावधी रूपये आहे.

Leave a Comment