फुकरे रिटर्न्सचा ट्रेलर रिलीज


जफर, चुचा, हनी आणि लाली यांची चौकडी परत आली आहे. मागील फुकरे प्रमाणे लोकांना केवळ चुना लावणार नाहीत तर पंजाबच्या भोलीसोबत पुन्हा खेळताना दिसणार आहेत. मागील फुकरेमध्ये त्यांनी भोलीला तुरुंगात पाठवले होते. तर आता फुकरे रिटर्न्समध्ये तुरुंगातून बाहेर आली आहे आणि त्यांच्यामागे हात धुवून लागली आहे. गेल्या वर्षी दिल्लीत फुकरे रिटर्न्सचे चित्रीकरण करण्यात आले होते आणि संपूर्ण चित्रपट दिल्लीवर आधारित आहे. आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

चुचा आता आपल्या स्वप्नांच्या पलीकडे गेला आहे आणि भविष्याबद्दलची एक झलकही त्याला दिसत आहे. एवढेच नाही तर ट्रेलरमध्ये चुचाला साप चावत आहे. तेव्हाच भोली पंजाबन उर्फ ​रिचा चढ्ढा नाच करत असल्याचे आपल्याला दिसत आहे. या वेळी ते मोठ्या पातळीवर घोटाळा करताना दिसून येणार आहेत. यावेळी त्या चौघांची लोकांकडून धुलाई होणार एवढे मात्र नक्की पण पण एक गोष्ट निश्चित आहे की, हा चित्रपट तुमचे भरपूर मनोरंजन करणार आहे. भोली पंजाबन कितीही त्रास देऊ दे पण चुचाचे तिच्या प्रति असलेले प्रेम यावेळेसही कमजोर पडले नाही आणि भोली पंजाबन त्याच्या बॉम्ब लावून त्याचे हालहाल करते.

दरम्यान फुकरेचा पहिला भाग २०१३ मध्ये आला आणि बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या चित्रपटाने त्यावेळी जवळपास ५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. फुकरे रिटर्न्स हा त्याचा चित्रपटाचा सिक्वेल आहे. ज्यामध्ये केवळ जुन्या चित्रपटातीलच कलाकार दिसणार आहे. फुकरे रिटर्न्समध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मन्जोत सिंग, रिचा चढ्ढा आणि अली फजलच्या मुख्य भूमिका आहेत. मृगदीप सिंह लांबा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून विपुल विग यांनी ही कथा लिहिली आहे. १५ डिसेंबर रोजी ‘फुकरे रिटर्न्स’ प्रदर्शित होणार आहे.