डुकाटीची खास, दमदार पेनिगल व्ही फोर बाईक


दमदार स्पोर्टस बाईक बनविण्यासाठी जगविख्यात असलेल्या इटालीच्या डुकाटीने त्यांच्या खास बाईकवरून नुकताच पडदा हटविला आहे. पेनिगल व्ही फोर या नावाची ही बाईक लवकरच बाजारात दाखल होत आहे. या बाईकचे खास वैशिष्ठ्य म्हणजे तिला ११०३ सीसीचे ९० डिग्रीवर काम करणारे व्ही फोर इंजिन दिले गेले आहे. या इंजिनमुळे बाईकला उच्च प्रतीची पॉवर व परफॉमन्स मिळाला आहे.

बाईकला फ्रंट एलईडी डे टाईम रनिंग लाईट, फुल एलईडी हेडलँप दिले गेले आहेत. या बाईकच्या इंजिनला १२ ते २४ हजार किमी रनिंग केल्यानंतरच सर्व्हीर्सिंगची गरज पडते असा कंपनीचा दावा आहे. बोश कंपनीची एबीएस सिस्टीम दिली गेल्याने वेगात असतानाही ही बाईक सहज थांबविता येते. या शिवाय ट्रान्झॅक्शन कंट्रोल, स्लाईड कंट्रोल, थ्री लेव्हल लाँच कंट्रोल व इलेक्टॉनिक सस्पेन्शन यामुळे चालकाला आरामदायी प्रवास करता येतो. ही बाईक रेसिंग, स्पोर्ट व स्ट्रीट अशा तीन मोडमध्ये चालविता येते व कोणत्याही परिस्थितीत चांगला परर्फार्मन्स देते. बाईकची किंमत अजून जाहीर केली गेलेली नाही.

Leave a Comment