चार वर्षात इतिहासजमा होणार डेबिट-क्रेडीट-एटीएम कार्ड


नवी दिल्ली : नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी येत्या तीन-चार वर्षात डेबिट आणि क्रेडिट कार्डसह एटीएमही इतिहासजमा होतील, त्याच्या जागी ग्राहकांचे व्यवहार हे मोबाईल फोनवरच होतील, असे भाकित वर्तवले आहे.

७२ टक्के भारताची लोकसंख्या ही ३२ वर्ष वयोगटातील आहे. अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत ही बाब भारतासाठी फायदेशीर ठरणारी असल्याचेही कांत यांनी म्हटले आहे. भारतातील बहुतांश आर्थिक व्यवहार हे आगामी तीन ते चार वर्षात मोबाईलवरच होतील. कारण क्रेडिट-डेबिट कार्ड, एटीएम हे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मागास ठरतील, असा अंदाज कांत यांनी व्यक्त केला. त्यांना नोएडा कॅम्पसमघ्ये अॅमिटी युनिव्हर्सिटीत मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आतापासूनच मोबाईलद्वारे ट्रँझॅक्शन्स करण्याचा ट्रेण्ड वाढीला लागल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment