‘हा’ डॉक्टर फक्त दोन रुपये नाममात्र शुल्क घेऊन करतो आहे रुग्णांचा इलाज


नवी दिल्ली: डॉक्टर हे दुसऱ्या प्रकारचे देव असल्याचे म्हटले जाते, पण काही डॉक्टर असे पण असतात की जे रुग्णांना लुटण्याचे काम करतात. बऱ्याचदा रुग्ण डॉक्टरांच्या महागड्या फी देऊ शकत नाही आणि उपचारांच्या कमतरतेमुळे ते आपले प्राण गमावतात. डॉक्टरांच्या शुल्क आणि लबाडीच्या नावाखाली हॉस्पिटलच्या कठोर नियमांमुळे लोकांना अशा अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. हेच कारण आहे की गरीब लोक देखील उपचारांसाठी थोडे पैसे बचत करून ठेवतात जेणेकरून डॉक्टरांच्या फी तरी वेळेत दिली जाऊ शकते.

होय असा देखील डॉक्टर आहे जो १९७३ पासून २ रुपये नाममात्र शुल्क घेऊन लोकांवर उपचार करत आहेत. चेन्नईचे ६७ वर्षीय डॉक्टर थिरूवेनगडम वीरराघवन यांनी स्टॅन्ली मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस केले होते. त्यांनी नंतर दोन रुपये घेत असलेली फी पाच रुपये केली आहे. तेव्हा वीरराघवन इतके लोकप्रिय झाले की त्यापरिसरात जवळच असलेल्या डॉक्टरांनी त्यांचाविरोधात आंदोलन करण्यास सुरूवात केली. शुल्क वाढवण्यासाठी डॉक्टर त्यांच्यावर दबाव टाकत होते. त्यांना डॉक्टरांनी सांगितले की किमान १०० रुपये फी म्हणून घेतले पाहिजे.

त्यांनी हे सर्व टाळण्यासाठी एक योग्य मार्ग शोधला. त्यांनी आता आपल्या शुल्काचा प्रश्न रुग्णांवर सोडला आहे. याचा अर्थ, शुल्क काय असावे आणि किती शुल्क द्यावे याचा निर्णय रुग्णांनी घ्यावा. आता रूग्ण त्यांना फी म्हणून पैसे किंवा खाण्यापिण्याचे सामना देऊ शकतात. त्यांच्या सेवेमुळे काही रुग्ण त्यांना दोन रुपयेवाले डॉक्टर म्हणून हाक मारतात.

डॉक्टर थिरुवेंगदाम वीरघवन सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत चेन्नईतील इरुकुखणी येथे रुग्णांना पहातात. त्यानंतर, मध्यरात्रीच्या वेळी वेश्यावस्तीत रूग्णांची देखभाल करण्यासाठी जातात. त्यांचे स्वप्न आहे की ते वेश्याव्यवसायात असणाऱ्या आणि असे जीवन जगणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी हॉस्पिटल उघडून आयुष्यभर त्यांची सेवा करावी. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डॉक्टर थिरुवेंगदाम म्हणतात की त्याला डॉक्टर बनण्यासाठी त्यांना पैसे खर्च करावे लागले नाही. समाजाच्या सेवेसाठी त्यांनी अभ्यास केला आहे आणि म्हणूनच ते लोकांकडून पैसे घेत नाही.

भाई वाह, जगाला डॉ. थिरूवेगदाम वीराराघवन सारख्या अधिक लोकांची आवश्यकता आहे कारण त्यांच्यामुळेच माणुसकी जिवंत आहे. थिरुवेगडम यांच्या डॉक्टरकीला माझा पेपरचा सलाम!

Leave a Comment