उ.कोरियात इंटरनेटला परवानगी


अतिशय कडक व विचित्र नियमांत जगणार्‍या उत्तर कोरियातील नागरिकांना इंटरनेट वापरण्याची परवानगी मिळाली आहे. आत्तापर्यंत येथे इंटरनेट वापरण्याची बंदी हेाती ती नुकतीच किम सरकारने हटविली आहे. अर्थात येथील नागरिक खासगी इंटरनेट इंट्रानेटचाच वापर सध्या करू शकणार आहेत.

इंटरनेट वापराची सुविधा उ.कोरियन नागरिकांना मिळाली असली तरी त्यांच्यावर अजून अनेक बंधने आहेत. त्यानुसार सरकारी चॅनल शिवाय अन्य कोणतेही चॅनल ते पाहू शकत नाहीत. अलिकडेच कोरियन चॅनल पाहणार्‍या ८० जणांना तेथे ठार केले गेले आहे. येथे सर्वसामान्य नागरिकांना कार खरेदी करणे, चालविणे, संगीत ऐकणे, गाणे, इंटरनॅशनल कॉल करणे, निळी जीन्स घालणे, दारू पिणे यावर कायद्यानेच बंदी आहे. येथे फक्त सरकारी अधिकारी कार चालवू शकतात व किम याचा कार्यक्रम असेल तरच वाद्य वाजवू शकतात. येथेील नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य नाही.

Leave a Comment