बाजारात परत येतेय लाडकी लँब्रेटा


वीस वर्षांपूवी केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय असलेली इटालीयन कंपनीची लँब्रेटा स्कूटर पुढच्या वर्षात पुन्हा नव्याने बाजारपेठेत दाखल होत आहे. गेली वीस वर्षे ही स्कूटर बाजारात उपलब्ध नाही.मिलान मोटर शोमध्ये लँब्रेटाची तीन नवी मॉडेल्स नुकतीच सादर करण्यात आली. व्ही ५० स्पेशल, व्ही १२५ स्पेशल व व्ही २०० स्पेशल अशी त्यांची नांवे आहेत.

या तिन्ही मॉडेल्समध्ये इंजिनाची क्षमता वेगवेगळी आहे. नव्या लँब्रेटांचे उत्पादन तैवान येथे केले जात आहे. युरोपीय बाजारात ती २०१८ च्या सुरवातीला उतरविली जाणार असून अन्य बाजारपेठात ती जून २०१८ पर्यत दाखल होईल असे सांगितले जात आहे. या तीनही मॉडेल्ससाठी स्टील बेस्ड बॉडी दिली गेली आहे. व्ही ५०साठी ४९.५ सीसीचे एअरकूल्ड कार्ब्युरेटेड सिंगल सिलींडर इंजिन दिले गेले आहे तर व्ही १२५ साठी १२४.७ सीसीचे फ्यूल इजेक्टेड मोटर व व्ही २०० साठी १६८.९ सीसीची फ्लूल इजेक्टेड मोटर दिली गेली आहे. या तीनही मॉडेल्ससाठी एलईडी लाईटस, १२ व्होल्टचे चार्जिंग सर्कीट व ६.५ लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे.

Leave a Comment