५ टक्क्यांवर आला हॉटेलमधील जेवणावरचा जीएसटी


नवी दिल्ली : हॉटेलमधील जेवणावरचा जीएसटी आता १८ टक्क्यांऐवजी ५ टक्के करण्याचा निर्णय काल झालेल्या जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल ही घोषणा केली.

ज्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटची वार्षिक उलाढाल आजपर्यंत १ कोटीपर्यंत होती, त्या हॉटेल आणि रेस्टॉरन्टना कम्पोझिशन स्कीमअंतर्गत ५ टक्के, विना एसी रेस्टॉरंटला १२ टक्के आणि एसी रेस्टॉरंट आणि बारमध्ये १८ टक्के जीएसटी भरावा लागत होता. ग्राहकांकडून हा जीएसटी वसूल केला जायचा. कम्पोझिशन स्कीममध्ये ग्राहकांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा मिळत नव्हता. पण अरुण जेटलींनी यावर सांगितले की, रेस्टॉरन्ट चालक ग्राहकांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा देत नसल्यामुळेच जीएसटी दरात कपात करुन, इनपुट टॅक्स क्रेडिट हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment