हाताला काम नसतानाही, घरी बसून एक तासात कमावते लाखो


नवी दिल्ली : आजच्या तरुणाईचे असे स्वप्न असते की, शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. यातील काहीजण आपले छंद सोडुन नोकरी करायला लागतात. आपल्याला आवडत असलेले काम जर आपल्याला मिळाले आणि त्यामुळे होत असलेली कमाई हे देखील विलक्षण ठरू शकते काय? असे होणे थोडे कठीण आहे पण अशक्य देखील नाही. जर ऑफिसला न जाता घरात बसूनच लाखो रुपये कमावले तर मग नोकरीची गरज काय? पण एका मुलीने असे केले आहे. जी एका तासात ८ लाखांपर्यंतची कमाई करते. आपण हे वृत्त वाचून आश्चर्यचकित नक्कीच झाले असाल. कारण जीवनाचा आनंद घेत असताना ही मुलगी लाखोची कमाई करत आहे. चला जाणून घेऊ या कसे ते…

Shooting at IEM with @hpaustralia. Got to play some Overwatch on the #Omenbyhp!! 😱#dominatethegame

A post shared by Minks | Chelsea (@xminks) on


ऑस्ट्रेलियात राहणारी चेल्सीयाला ऑफिसमध्ये कॉम्प्यूटरच्या समोर बसून काम करणे पसंत नव्हते. ती आणखी पैसे कमविण्यासाठी आणखी एखादा मार्ग शिध्त होती. ज्यामध्ये ती आरामशीर कमाई करू शकेल. त्यानंतर तिला ऑनलाइन व्हिडिओ गेममधून पैसे कमवण्याची कल्पना सुचली. त्यानंतर तिने व्हिडिओ गेम्स खेळण्यास सुरुवात केली. चेल्सीला एका तास व्हिडीओ गेम खेळण्यासाठी जवळजवळ ८ लाख रुपये मिळतात. तिचे एकूण ३५ लाख फॉलोअर्स आहेत.


ज्यावेळी ती गेम खेळत असते त्यावेळी लोक ती खेळत असलेला गेम लाईव्ह पाहतात. सबस्क्रिप्शनच्या उपलब्धतेसह थेट लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी आणि प्रायोजक म्हणून तिला सुमारे ८ लाख मिळतात. चेल्सीला पार्टीचा खूप शौक आहे. ती सोशल मीडियावर आपले अनेक फोटो अपलोड करत असते. तिने फार्मसीमधून पदवीधर आहे, पण तिला नोकरीच करायची नव्हती. ती म्हणते की, जेवढी कमाई मी गेम खेळून कमावते तेवढी मी नोकरी करून देखील कमावू शकली नसती. एवढेच नव्हे तर, या कमाईसह ती आपल्या संपूर्ण कुटुंबाचा खर्च देखील उचलते.

Excited the streams are back! Lets play some H1Z1 😁♥️

A post shared by Minks | Chelsea (@xminks) on


त्याचबरोबर ती लोकांच्या कल्याणासाठी पैसे देखील दान करते. ती अनेक सामाजिक कार्य करत राहते. ते बऱ्याच कार्यक्रमात ती सहभागी होत असते आणि ज्यांना पैशाची गरज असते, त्यांना ती पैसे दान करते.