बनाना चोकलेट चीप केक

cake

बनाना चोकलेट चीप केक

केकसाठी लागणारी सामग्री –
१ १/४ कप मैदा किवा गव्हाचे पीठ
१ छोटा चमचा – बेकिंग पावडर
१ छोटा चमचा – बेकिंग सोडा
१/२ कप बटर
३/४ कप साखर
१ कप – कुस्करलेली केळी (२)
२ अंडी
१/२ कप – बारीक कापलेले अक्रोड किवा बदाम
थोडे चोकलेट चिप्स
चवीला वेलची पावडर
१ छोटा चमचा – वनीला इसेन्स

केक बनवण्याची प्रक्रिया –

    * मिक्सर मध्ये अंडी फिरवून घ्यावी आणि वेगळी ठेवावी.
    * बटर आणि साखर मिक्स करून थोडी फेटून घ्यावी.
    * मिक्सर मध्ये मैदा, बटर + साखर मिक्षर आणि अन्य सामग्री (अक्रोड सोडून ) निट फिरवून घ्यावी.
    * अंडी त्यात मिसळावी आणि परत निट फिरवून घ्याव.
    * बेकिंग प्यान ला बटर पेपर लावून मग त्यात वरचे मिश्रण व अक्रोड टाकावे.
    * ओव्हन १८० C वर आधी गरम करावे मग बेकिंग प्यान ४० मीनीट ठेवावी – वेळ आल्यास थोडं जास्त ठेवावं लागेल ( केक मध्ये फोर्क टाकून चेक करावे – केक चे क्रंब लागले नाहीत म्हणजे केक तयार आहे )

– रिचा कुलकर्णी.

1 thought on “बनाना चोकलेट चीप केक”

Leave a Comment