इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्रे

इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र हे वाचून सर्वांनाच मोठा धक्का बसला असेल, पण हे खरे आहे. भारतात अजून इंटरनेट व्यसन मुक्ती केंद्र सुरू झालेले नाही. मात्र अमेरिका, चीन आणि कोरिया या देशांत इंटरनेट वापरणार्‍यांचे प्रमाण अधिक असल्याने याठिकाणी अशा स्वरूपाची व्यसनममुक्ती केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

इंटरनेट अथवा व्हिडिओ गेम्स हे व्यसन आहे असे म्हटल्यावर अनेकांना आश्‍चर्य वाटायला लावते. मात्र याबाबत नुकताच सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये विदेशात दिवसेंदिवस इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आले. यापूर्वी दारू, सिगारेट व ड्रग्ज घेणे हेच आपण व्यसन समजत होतो. मात्र एखाद्या गोष्टीच्या अति प्रमाणात आहारी जाणे म्हणजे व्यसन होय.

नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार अमेरिका, चीन व पाश्‍चात्य राष्ट्रात इंटरनेट वापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याच देशात इंटरनेटची उपलब्धता व प्रसार यामुळे संपूर्ण युवा पिढी याच्या आहारी गेली आहे. त्यामुळे आता त्याच्यावर उपाय म्हणून इंटरनेटचा वापर कमी करण्याबाबत जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर प्रमुख शहरातून यामधून सुटका करून घेऊ इच्छिणार्‍यांसाठी इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आली असून, त्याच्या माध्यमामध्ये इंटरनेटचे व्यसन सोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Leave a Comment