येथे तुम्ही ५० मिनिटांत ३ पराठे खाल्ले तर आयुष्यभर जेवण फुकट


नवी दिल्ली: भारतात असा क्वचितच व्यक्ती मिळेल ज्याला पराठा आवडत नाही. पराठा एका असा खाद्यपदार्थ आहे जो सकाळी नाश्त्यापासून ते रात्री पर्यंत आपले पोट भरलेले ठेवते. पराठ्यामध्ये अनेक विविधता देखील आहेत. बटाटाच्या पराठ्यापासून कांदाच्या पराठ्यापर्यंत. पराठ्याचे नाव ऐकूनच लोकांच्या तोंडात पाणी येते. लोकांची पराठ्याला मिळणारी पसंती पाहून एका दुकान मालकाने अशी योजना ठेवली आहे. जी एकून तुम्ही नक्कीच या दुकानाला भेट द्याल. येथे देशातील सर्वात मोठा पराठा मिळतो. त्याचा आकार १ फूट ६ इंच आणि वजन १ किलोग्राम आहे.

या दुकानाचे नाव तपस्या पराठा जंक्शन असे आहे. जे दिल्ली-रोहतक बायपास रोडवर आहे. येथे दररोज हजारो लोक येतात. हे दुकान या आव्हानामुळे अतिशय लोकप्रिय झाले आहे. हे दुकान सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे. येथे अनेक लोक येतात हे आव्हान घेण्यासाठी पण एक पराठा जरी पूर्ण खाल्ला नाही आपली हार देखील स्वीकार करतात.

हे पराठे तेलकट नाहीत … पण ते देशी तुपात बनले आहेत. ते वजनी असल्याने आणि सहजपणे खाऊ शकत नाही आणि कोणीही हे ३ पराठे सहजरीत्या खाऊ शकत नाही. हे दुकान सुमारे १० वर्षांपासून आहे. आतापर्यंत एकच व्यक्ती हे आव्हान पूर्ण करू शकला आहे. दरम्यान पराठा होण्यासाठी खूप वेळ लागतो. कारण तो आकारापेक्षा मोठा आहे आणि वजन खूप जास्त आहे. पराठाचे अनेक प्रकार आहेत. पनीर, स्वीट, छोले, मटार, पालक, मुळा असे पराठे येथे मिळतात. जे खूप प्रसिद्ध आहेत.

Leave a Comment