तुम्ही कधी जाणून घेतले आहे का असतात जीन्सच्या पॉकेटवर लहान बटने?


आपण जीन्स पॅन्ट खरेदी करताना त्याचा रंग, डिझाईन, कपडा कसा आहे, स्ट्रेट फिट किंवा पेन्सील बॉटम कशी असावी याचा पुरेपुर विचार करत असतो. त्यात आपल्याला जरी जीन्समधील काही आवडले नाहीतर ती जीन्स आपण घेत नाही. पण तुम्ही कधी जीन्स विकत घेताना जीन्सच्या पॉकेटवर असलेल्या धातूच्या छोट्या छोट्या बटनांवर कधीच लक्ष देत नसाल. पॉकेटवर लावण्यात आलेली ही धातूची बटने डिझाईन किंवा स्टाईल म्हणून लावण्यात आली असेल तुम्हाला वाटत असेल, पण तसे नाही आहे. आपल्याला हे जाणून घेण्यासाठी जरा इतिहासात जावे लागेल.

पूर्वी पाश्चिमात्य देशातील कामगार जीन्स घालायचे, कठिण परिश्रम त्यांना करावे लागत असल्यामुळे जीन्सच्या पॉकेटचे फाटने एक सर्वसामान्य गोष्ट होती. ही एक समस्या तेव्हा बनली होती. कारण कामगारांसाठी पॉकेट अनेकदॄष्टीने महत्वाचे होते.

या समस्येवर मात करण्यासाठी त्यामुळे एका टेलरने शक्कल लढवली. ही आयडियाची कल्पना जॅकब डेविस याला सुचली आणि या समस्येवर त्याने उपाय शोधून काढला. १८७३ मध्ये जीन्सच्या डिझाईनमध्ये त्याने असा बदल केला, जो आजही बघायला मिळतो. तिच डिझाईन आजही चालत आहे. त्याकाळात Levi Strauss & Co., जी आज Levi’s च्या नावाने प्रसिद्ध आहे त्या कंपनीचे जॅकब हे एक ग्राहक होते.

जीन्सच्या पॉकेटच्या बॉर्डरवर जॅकबने धातूचे बटन लावले. जीन्सचे पॉकेट यामुळे ताणले जात होते आणि यामुळेच पॉकेट फाटण्यापासून वाचत होते. त्याची ही आयडिया जॅकबला पेटंट करायची होती. पण त्याच्या पैसे नसल्याने तसे करता आले नाही. नंतर त्याने Levi Strauss ला १८७२ मध्ये पत्र लिहून त्याची ही आयडिया विकत घेण्याचा प्रस्ताव दिला. पण त्याने त्यात एक अट ठेवली आणि ती अट म्हणजे या आयडियाच्या बदल्यात Levi Strauss याने जॅकबला पेटेंट करण्यासाठी पैसे द्यावे आणि तसेच झाले. आपल्या जीन्सवर तेव्हापासून ही बटने अशाप्रकारे बघायला मिळत आहेत. ही बटने सहजासहजी कुणी काढूही शकत नाही.