दोन कॅमेर्‍यांचा जी २४ फिचर फोन फक्त ८९९ रूपयांत


एमटेक या कंपनीने जी २४ हा खास फिचर फोन भारतीय बाजारात आणला असून केवळ ८९९ रूपयांत तो उपलब्ध आहे. देशभरातील २० हजार रिटेल स्टोअर्सबरोबरच तो अमेझॉन, फ्लिपकार्ट या ई कॉमर्स साईटसवरही उपलब्ध करून दिला गेला आहे. जिओला टक्कर देण्यासाठी हा फोन बाजारात आणला गेल्याचे सांगितले जात आहे. मायक्रोसॉफ्टनेही बीएसएनएल सोबत भारत वन हा फोन लाँच केला आहे. त्यामुळे या बजेट फिचर फोनमधील स्पर्धा आता खर्‍या अर्थाने रंगणार असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

जी २४ फोनला १.८ इंची स्क्रीन दिला गेला असून त्याला रियर व सेल्फीसाठी फ्रंट असे दोन कॅमेरे दिले गेले आहेत. दिसायला आकर्षक असा हा फोन इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू व बंगाली या पाच भाषांना सपोर्ट करतो. त्याला १ हजार एमएएच ची बॅटरी, १६ जीबीची इंटरनल मेमरी, कार्डच्या सहाय्याने ती वाढविण्याची सुविधा, एमपी थ्री, एमपी फोर, वायरलेस एफएम रेडियो, ब्ल्यू टूथ, ऑडिओ व्हिडीओ रेकॉडिग, ऑटो कॉल रेकॉर्ड, टॉर्च अशी फिचर्स आहेत. हा फोन काळा, लाल, ब्ल्यू, ग्रे आणि ब्राऊन अशा पाच रंगात आला आहे.

Leave a Comment