वृद्ध,दिव्यांगांना घरपोच बँक सेवा मिळणार


रिझव्हॅ बँकेने नुकत्याच जारी केलेल्या आदेशांनुसार ७० वर्षांपुढील वृद्ध व दिव्यांगांना घरपोच बँक सेवा दिली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने या संदर्भात दिलेल्या आदेशात सावर्जनिक, खासगी बँकांबरोबरच छोट्या अर्थ संस्था, पेमेंट बँकांचाही समावेश केला गेला आहे. ३१ डिसेंबरपासून ही सेवा सुरू केली जाणार आहे.

या सेवेअंतर्गत रोख रकम काढणे, रोख रकमा बँकेत भरणे, चेकबुक, डिमांड ड्राफ्ट, केवायसी कागदपत्रे, हयातीचे दाखले अशा सेवा दिल्या जाणार असून सर्व बँकांनी या सेवांसंदर्भातली माहिती त्यांच्या प्रत्येक शाखेत तसेच वेबसाईटवरही द्यायची आहे. बॅकांच्या अनेक शाखांतून वृद्ध तसेच दिव्यांगाना चांगली वर्तणूक दिली जात नसल्याचे तसेच या लोकांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे लक्षात आले आहे. अनेकदा या ग्राहकांना कामे न होताच बँकातून परत पाठविले जाते. ही गैरसोय टाळण्यासाठी वरील आदेश जारी केले गेले आहेत.

निवृत्तीवेतनासाठी दरवर्षी द्यावा लागणारा हयातीचा दाखला ग्राहकाचे ज्या बँकेत पेन्शन खाते असेल त्या बँकेच्या कोणत्याही शाखेत यापुढे जमा करता येणार आहे. तसेच दरवर्षी सेव्हींग खातेधारकांना २५ चेकचे पुस्तक मोफत दिले जावे असेही आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

Leave a Comment