जीसएटीसंदर्भात सुशील मोदी यांनी केले मोठे विधान


नवी दिल्ली – बिहार चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात जीसएटीसंदर्भात एक मोठे विधान बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटी परिषदेचे सदस्य सुशील मोदी यांनी केले असून सुशील मोदींनी जीएसटी अंतर्गत २८ टक्के कर आकारल्या जाणा-या ८० टक्के वस्तूंवरील कर कमी केला जाणार असल्याचे म्हटले आहे. १८ टक्के कर या सर्व वस्तूंवर आकारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सुशील मोदींच्या या माहितीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गामध्ये जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. यातच आगामी काळात गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर २८ टक्के जीएसटी आकारला जाणा-या वस्तूंवरील कर कमी केला जाण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

सध्याच्या घडीला एकूण २२७ वस्तूंवर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येतो. सुशील मोदी याबाबत सांगताना म्हणाले की, जीएसटी परिषदेच्या बैठकीला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या बैठकीत २८ टक्के जीएसटी असलेल्या ८० टक्के वस्तूंवर यापुढे १८ टक्केच जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याशिवाय १८ टक्के कराच्या टप्प्यात येणाऱ्या अनेक वस्तूंचा समावेश १२ टक्क्यांच्या टप्प्यात करण्यात यावा, अशी शिफारसदेखील करण्यात आली आहे. गुवाहाटीमध्ये आज आणि उदया जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. कर कपातीचा निर्णयया बैठकीत घेतला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment