तब्बल १ लाख भारतीयांनी मंगळ मिशनसाठी केले बुकिंग


मुंबई- तब्बल १ लाख ३८ हजार ८९९ भारतीयांनी मंगळावर जाण्यासाठी बुकिंग केले आहे. नासाचे २०१८मध्ये मंगळावर जाण्याचे मिशन सुरू होणार असून त्यासाठी तिकीटांचे बुकिंग सुरू झाले आहे. नासाने ही तिकीट विक्री सुरू करताच या तिकीट खरेदीला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. तब्बल १ लाख ३८ हजार ८९९ भारतीयांनी यात मंगळावर जाण्यासाठी तिकीट बुक केले आहे. भारत मंगळावर जाण्यासाठी तिकीट बुक करणाऱ्या देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

इनसाईट मिशन अंतर्गत मंगळावर जाण्याची मोहीम नासाने आखली आहे. मंगळावर जाण्यासाठी ज्या लोकांनी तिकीट बुक केले आहे, नासाकडून त्यांना ऑनलाइन बोर्डिंग पास देण्यात येणार आहे. एका सिलिकॉन चिपवर इलेक्ट्रॉनिक्स बीमच्या मदतीने मंगळावर जाणाऱ्यांची नावे कोरण्यात येणार आहेत. केसांच्या हजाराव्या भागाहून पातळ चिपवर कोरलेली ही अक्षरे असतील, असे सुत्रांनी म्हटले आहे. मंगळ मिशनसाठी अमेरिकेतून ६ लाख ७६ हजार ७७३ लोकांनी तिकीट बुकिंग केले आहे. तर दुसऱ्या स्थानावर चीन असून चीनमधून २ लाख ६२ हजार ७५२ लोकांनी मंगळावर जाण्यासाठी बुकिंग केल आहे.

Leave a Comment