गुगलचा डूडलद्वारे सितारा देवी यांना सलाम!


मुंबई: गुगलने डूडलद्वारे कथ्थकच्या सच्च्या उपासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांना सलामी दिली आहे. गुगलने सितारा देवी यांच्या जयंती निमित्त त्यांचे डूडल साकारले आहे.

सितारा देवी यांना ‘नृत्य सम्राज्ञी’ अशी उपाधी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती. सितारा देवी त्यावरुन यांच्या नृत्यकलेची कल्पना येऊ शकते. कथ्थकसारख्या नृत्यप्रकारात वयाच्या सोळाव्या वर्षी सितारा देवी यांची वीजेसारखी लखाकणारी कला पाहून, रवींद्रनाथ टागोर भारावून गेले होते. त्यांनी त्यामुळेच सितारा देवी यांना ‘नृत्य सम्राज्ञी’ अशी उपाधी दिली होती.

Leave a Comment