बंद झालेल्या जुन्या नोटांही करतील मालामाल


नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्याच्या घटनेला आज वर्ष पूर्ण होत आहे. नोटबंदी जाहीर झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या जुन्या नोटांचा बँकात भरणा केला मात्र कांही जणांना कांही कारणांनी नोटा बँकांत जमा करणे जमलेले नाही. मात्र या नोटा आता केवळ कागद उरल्याची भावना मनात असेल तर ईबे वर आपण या जुन्या नोटांबदलीही चांगली रक्कम कमावू शकणार आहात. ईबे या ऑनलाईन विक्री साईटवर खास नंबरच्या जुन्या नोटांना लिलावात चांगली किंमत मिळते आहे.

अर्थात असे लिलाव नेहमीच होत असतात व जगभरातील सर्व देशांत असे लिलाव होतात. जुन्या नाणी नोटांचे संग्राहक अशा नोटांना चांगली किमत देतात. भारतात रद्द झालेल्या ५०० व १ हजार च्या नोटांबरोबरच नव्या नोटांनाही या विक्री साईटवर चांगली किंमत मिळते आहे. या लिलावात कुणीही सहभागी होऊ शकते. खास सिरीज, खास नंबर, प्रिटींग मिस्टेक असलेल्या अशा अनेक प्रकारच्या नोटा येथे विकत मिळू शकतात. इस्लाम धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या ७८६ नंबर असलेल्या नोटांना येथे १ ते ३ लाखांपर्यंत किंमत मिळते आहे.

नोट जितकी जुनी व दुर्मिळ तितकी तिची किंमत जास्त असा हा प्रकार आहे. ५०० व १ हजारच्या नोटा येथे २९९ पासून १० हजार रूपयांच्या दरम्यान विकल्या जात आहेत. २०० व ५०० रूपयांच्या नव्या नोटाही येथे विक्रीसाठी आहेत. नवीन ५०० रूपयांची खास नोट १२०० रूपयांत तर दांडी मार्च काळ दाखविणारी ५०० रूपयांची नोट चक्क ७ लाख रूपयांत विकली जात आहे. ७८६ सिरीयल नंबरच्या १ रूपयाच्या नोटेला १४०, १०० रूपयांच्या नेाटेला २७५, १० रूपयांच्या नोटेला १२० रूपये मिळत आहेत. पूर्ण चक्र असलेली २० रूपयांची नोट १६९९ रूपयांत विकली जात आहे.

Leave a Comment