हेनेसीची व्हेनॉम एफ ५, सर्वाधिक वेगवान कार


लास वेगास येथील सेमा ऑटो शो मध्ये अमेरिकन मोटर उत्पादक कंपनी हेनेसी ने अतिवेगवान कार व्हेनॉम एफ ५ सादर केली असून या कारचे डिझाईन आणि स्टाईल एकदम नवीन आहे. ही हायपरकार जगातील सर्वात वेगवान कार असल्याचा कंपनीचा दावा आहे. सध्या अगेरा आरएस ही जगातील वेगवान कार म्हणून गिनीज बुकमध्ये नोंदली गेली असून तिचा वेग आहे ताशी ४४४.६ किमी. व्हनॉमाचा वेग ताशी ४८२ किमी असल्याचा दावा हेनेसीने केला आहे. सध्यातरीही कार रेसिग ट्रॅकवर पळविली जात आहे.

या कारसाठी हलक्या कार्बन फायबरपासून बॉडी बनविली गेली आहे व एअरोडायनामिक्स तंत्रज्ञानाचा अतिशय कुशल वापर केला गेला आहे. कारचा वेग सहन करू शकतील असे खास टायर्स तिला दिले गेले आहे. ट्वीन टर्बो व्ही ८ इंजिन व सेव्हन स्पीड सिंगल क्लच पॅडल शिफ्ट ट्रान्समिशन सिस्टीम दिली गेली असून ही कार ० ते ३०० किमीचा वेग १० सेकंदापेक्षा कमी वेळात घेते.० ते ४०० किमीचा स्पीड घेण्यास तिला ३० सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो. या कारची सध्या फक्त २४ युनिट बनविली गेली असून तिची किंमत आहे १६ लाख डॉलर्स. भारतीय रूपयांत हीच किंमत १० कोटी ३४ लाख रूपये होते.

Leave a Comment