प्रशांत महासागरात आढळली घोस्ट सिटी


नव्या तंत्रज्ञानाच्या कमालीमुळे प्रशांत महासागरात तरंगणारी हजारो वर्षे जुनी नगररचना संशोधकांसमोर आली असून यामुळे पुरातत्त्वतज्ञ आश्चर्यचकीत झाले आहेत. या नगराला भुतांचे शहर अथवा घोस्ट सिटी असे संबोधले गेले आहे. विशेष म्हणजे या शहराचा शोध कुणीच लावलेला नाही तर उपग्रह प्रतिमेतून हे शहर समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोंपेईजवळ मायक्रोनेशिया आयलंडजवळ या शहराचा शोध लागला आहे. या शहराला नान मडोल म्हणजे अंतराळातील असे उल्लेखले गेले आहे. या शहराची तुलना समुद्रात बुडालेल्या अटलांटिस शहराबरोबर केली जात आहे. पेंपोई किनार्‍यावर सुमारे १०० बेटांचा हा समुह असून ही सर्व बेटे एकाच आकाराची आहेत असे उपग्रह प्रतिमेवरून दिसते आहे. हा भाग अतिशय दुर्गम असून तो लॉस एंजेलिसपासून २५०० मैलांवर तर ऑस्ट्रेलियापासून १६०० मैलांवर आहे. येथे प्रत्यक्ष जाणे दुरापास्त असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

या बेटांवर प्राचीन काळी म्हणजे १ल्या वा दुसर्‍या शतकात वसाहत असावी असा अंदाज केला जात आहे.येथे २५ फूट उंच व १७ फूट जाडीची भिंत दिसते आहे व ती समुद्र लाटांपासून संरक्षणासाठी उभारली गेली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment