रेनाँची झोई ४० इलेक्ट्रीक कार लाँच


फ्रेंच कार मेकर रेनाँने त्यांची नवी इलेक्ट्रीक कार झोई ४० दुबईत लाँच केली आहे. या कारची किमत साधारण १८.५० लाख रूपये आहे. संयुक्त अरब अमिरातीत इलेक्ट्रीक कार वापराला प्रोत्साहन देण्यात ही कार महत्त्वाची ठरेल असे सांगितले जात आहे. ही कार सिंगल चार्जवर २५० मैल जाते व इलेक्ट्रीक करंटच्या क्षमतेनुसार १ ते ४ तासात पूर्ण चार्ज होते.

या कारसाठी दिलेली नवी बॅटरी म्हणजे इलेक्ट्रीक वाहन बॅटरीतील पुढचे पाऊल म्हणता येईल असे कंपनीचे म्हणणे आहे. या कारमध्ये पाच प्रवासी आरामात प्रवास करू शकतात. इन्फोटेनमेंटसाठी मोठा टचस्क्रीन, मॉडर्न इंटरफेस, नेविगेशन व ब्ल्यूटूथ दिला गेला असून अँटी ब्रेकींग सिस्टीम, इलेक्ट्रीक स्टॅबिलिटी कंट्रोल अशी फिचर्सही आहेत. कंपनीने या कारची ५ मॉडेल्स सादर केली आहेत. प्री कुलींग सिस्टीम मुळे पॅसेंजर कपांर्टमेंट गरजेनुसार कूल करता येण्याची सुविधा मिळाली आहे. ऑटो गिअरबॉक्स व स्टँडर्ड अशी दोन्ही ऑप्शन दिली गेली आहेत. रेन, लाईट सेन्सर्स, फ्रंट विंडस्क्रीन वायपर्स व लाईट गरजेनुसार आपोआप ऑन होतात. भारतात ही कार कधी येणार याची माहिती दिली गेलेली नाही.

Leave a Comment