घरूनच करा बँक खाते आधारसोबत करा लिंक


नवी दिल्ली : ३१ डिसेंबर ही आपल्या बँक खात्याला आधारसोबत लिंक करण्याची शेवटची तारीख असून बँक खात्यांना आधारसोबत लिंक करणे सरकारने बंधनकारक केले आहे. तुम्ही जर तुमचे खाते आधारशी लिंक केले नसेल तर हे काम तुम्हाला लवकरात लवकर करावे लागणार आहे. तुम्हाला यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. तुम्ही आधार बँक खात्यासोबत घरबसल्याही लिंक करू शकता.

आधारशी बँक खात्याला जोडण्यासाठी तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन आधार नंबर आणि बँक खात्याची माहिती बँक अधिका-यांना द्या. बँक अधिकारी खाते आधारशी लिंक करून देतील. तुम्हाला यासाठी त्यांना आधार कार्डची झेरॉक्स कॉपी आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.

आधार इंटरनेट बँकिंग द्वारेही लिंक केले जाऊ शकते. इंटरनेट बँकिंग लॉगिन केल्यानंतर लिंक यूअर आधार नंबर हा पर्याय सिलेक्ट करा. आधार रजिस्ट्रेशनचे पेज या पर्यायावर क्लिक केल्यास ओपन होईल. यात ट्रान्झॅक्शन अकाऊंट, मोबाईल क्रमांक, आधार नंबर आणि कन्फर्म आधार नंबर भरा. तुम्हाला सबमिट केल्यानंतर एक रेफरन्स नंबर मिळेल. रेफरन्स नंबर नोट करून घ्या. तुमचे आधार खात्याशी लिंक होईल. आधार लिंक झाल्याची माहिती तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एसएमएस द्वारे दिली जाईल.

आणखी एक पर्याय बँकांनी खात्याशी आधार लिंक करण्यासाठी दिला आहे. आपले खाते असलेल्या बँकेच्या एटीएममध्ये जाऊनही खातेधारक आधार लिंक करू शकतात. एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकून पिन नंबर टाका. विंडोवरील पर्यायांमधील सर्व्हिस-रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. त्यानंतर आधार रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. आपले खाते बचत आहे की, चालू हे सिलेक्ट करा. तुम्हाला त्यानंतर तुमचा आधार नंबर द्यावा लागेल. ही सगळी माहिती दिल्यानंतर आपले बँक खाते आधारसोबत लिंक होईल.

Leave a Comment