रामरहिम व हनीप्रित गाढवाच्या जोडीला ११ हजाराची किंमत


उज्जैन येथे दरवर्षी भरणार्‍या गाढव बाजारात यंदा रामरहीम व हनीप्रीत या गाढवाच्या जोडीला ११ हजार रूपयांची किंमत मिळाली. गुजराथच्या हरिओम प्रजापत या विक्रेत्याने ही जोडी विक्रीसाठी आणली होती. त्याला वास्तविक या जोडीसाठी २० हजार रूपयांची किंमत अपेक्षित होती मात्र त्याला ११ हजारावर समाधान मानावे लागले.

उज्जैन येथील गाढव बाजार देशात प्रसिद्ध असून येथे मध्यप्रदेशाबरोबरच महाराष्ट्र, राजस्थान व गुजराथेतून गाढवे विक्रीसाठी आणली जातात. यंदाच्या बाजारात २ हजार गाढवे विक्रीसाठी होती. गाढवांकडे ग्राहकाचे लक्ष आकर्षित व्हावे म्हणून त्यांना विविध नांवे दिली जातात.त्यात बलात्कार प्रकरणात तुरूंगात असलेला सच्चाडेराचा रामरहिम व त्याची कथित कन्या हनीप्रित यांचीही नावे गाढवांना दिली गेली होती. याचबरोबर जीएसटी, सुल्तान, बाहुबली, जिओ नावंाची गाढवेही होती. अर्थात गाढव खरेदी करणारे ग्राहक केवळ नावे पाहून नाही तर गाढवाची जात, त्याची वैशिष्ठ्ये पाहूनच खरेदी करत असतात. क्षिप्रा नदीकाठी हा बाजार भरतो.

Leave a Comment