अॅपलकडून प्रथमच भारतात कँपस मुलाखती


टेक कंपनी अॅपल यंदा प्रथमच भारतात इंजिनिअरींग कॉलेज कँपसमधून प्लेसमेंट करणार आहे. हैद्राबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी व त्यानंतर बंगलेार मधील कँपसमधून कंपनी मुलाखती घेणार आहे. यामुळे यंदा विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला असून त्यांचे टॅलंट दाखविण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असल्याने संस्थेतर्फे सांगण्यात येत आहे. अॅपलबरोबरच गुगल, मायक्रोसॉफ्ट, फिलिप्स या कंपन्याही कँपस मुलाखतींसाठी येत आहेत.

यंदा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, ऑटोमेशन या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगली संधी असून अनेक कंपन्या या क्षेत्रातच भरती करण्यासाठी उत्सुक आहेत. यंदाच्या वर्षी हार्डवेअर इंजिनिअ्रर्ससाठी अधिक संधी आहेत असे शिक्षण संस्थांचे निरीक्षण आहे.

Leave a Comment