पॅराडाईज पेपर्समुळे काळा पैसा संदर्भात मोठा खुलासा


जर्मनीच्या जीटॉय सायटुंग या वर्तमानपत्राने सर्वप्रथम जगासमोर आणलेल्या पनामा पेपर्सनंतर आता ९८ मिडीया संस्थांसह केलेल्या घोटाळा पेपर तपासात निष्पन्न झालेली कागदपत्रे पॅराडाईज पेपर्स नावेने उघड केली असून यात परदेशात काळा पैसा गुंतविणार्‍या अनेक बड्या उद्येागपतींची, राजघराण्याची नावे समोर आली आहेत. या संदर्भातले १ कोटी ३४ लाख पेपर्स तपासले गेले आहेत. यात ब्रिटनची राणी एलिझाबेथ दोन सह १८० देशांतील लोकांची नावे आहेत. यात भारत १९ व्या स्थानावर असून ७१४ भारतीयांची नांवे यात सामील आहेत.

या कागदपत्रांनी अनेक बनावट फर्म व बनावट कंपन्यांनी जगभरातील श्रीमंतांचे तसेच बलवान व्यक्तींचा पैसा परदेशी फर्ममधून गुंतविण्यासाठी मदत दिली असल्याचे दिसून आले आहे. त्यात बर्मुडा फर्म अपलबस ही आघाडीवर आहे. या कागदपत्रांत नांवे असलेल्यांत भारतातील राज्यमंत्री जयंत सिन्हा, बिग बी यांचीही नांवे असल्याचे समजते.

Leave a Comment