
सेन्ट फ्रांसिस्को : तब्बल ३७०,००० डॉलर किंमतीचे ३०० आयफोन १० अमेरिकेतील सेन्ट फ्रांसिस्कोमध्ये चोरांनी चोरी केले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सेन्ट फ्रांसिस्को येथील अॅपल स्टोरच्या बाहेर उभे असलेल्या यूपीएस ट्रकमधून तीन चोरांनी अॅपलच्या या स्मार्टफोन्सची चोरी केली. हा ट्रक ३१३ अॅपल आयफोन १० च्या डिलिव्हरीसाठी जात होता. त्यात प्रत्येक आयफोन हा ९९९ डॉलरचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
चोरट्यांनी मारला ३०० हुन अधिक आयफोन-१०वर डल्ला
अमेरिकेच्या पॅकेज वितरण कंपनी यूपीएस यांनी या प्रकरणी सांगितले की, चोरीचा तपास करण्यासाठी कायदा प्रवर्तक संस्था मदत करत आहेत. चोरी केलेला फोन अॅपल आयफोनमध्ये असलेल्या ‘फाइंड माय आयफोन’ किंवा ‘रिमोट लॉकआऊट’ फीचरने शोधू शकतात. त्यामुळे आयफोनच्या चोरीचे प्रकरण कमी झाले होते. मात्र शक्कल लढवत चोरांनी ही सेवा सुरु होण्याआधीच आयफोनची चोरी करत आहेत. भारतात आयफोन-१० (६४ जीबी) शुक्रवारपासून ८९,००० रुपयांना मिळत आहे. याला युजर्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
