कोणीतरी आहे तिथे…नासाकडून 22 ध्वनिफीती प्रसिद्ध


अंतराळात पृथ्वीशिवाय अन्य ग्रहांवरही जीव राहतात, याचे पुरावे अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या हाती लागले आहेत. नासाला अंतराळातून विविध प्रकारच्या आवाजाचे नमुने मिळाले असून नासाने या पद्धतीच्या 22 ध्वनिफीती प्रसिद्ध केल्या आहेत.

शनी आणि गुरू ग्रहावर ऐकू येणाऱ्या आवाजाच्या या ध्वनिफीती असून हे आवाज अत्यंत भीतीदायक आहेत. स्पेस साऊंड असे या ध्वनिफीतींचे नाव आहे. अंतराळ अत्यंत संतप्त असून कोणीतरी जोरजोरात दगड मारत आहेत, असे हे आवाज ऐकून वाटते. अशा प्रकारचे आवाज प्लाझ्मा तरंगात येतात, असे नासाचे म्हणणे आहे.

नासाच्या यानांवरील एम्फिसिस नावाच्या उपकरणाच्या माध्यमातून हे आवाज सहज ऐकता येतात. अनेक वर्षांपासून चालू असलेल्या नासाच्या अंतराळ मोहिमांच्या दरम्यान हे आवाज नोंदण्यात आले आहेत. काही अंतराळ यानांवर रेडियो एमिशन पकडणारे उपकरण असतात. शास्त्रज्ञांनी या एमिशनचे रूपांतर ध्वनिलहरींमध्ये केले आहे. आता शास्त्रज्ञ या ध्वनींचे संशोधन करत आहेत.

Leave a Comment