५५ सेकंदात १६०९ किमीचा वेग घेणारी ब्लडहाऊंड एसएससी कार - Majha Paper

५५ सेकंदात १६०९ किमीचा वेग घेणारी ब्लडहाऊंड एसएससी कार


आठ वर्षांच्या सततच्या संशोधनानंतर प्रचंड वेग घेऊ शकणारी सुपरसॉनिक कार तयार करण्यात संशेाधकांनी यश मिळविले असून या कारची पहिली चाचणी इंग्लंड येथे नुकतीच पार पडली. ब्रिटीश इंजिनिअर्स नी दिलेल्या माहितीनुसार पेन्सिलच्या आकाराची ब्लडहाऊंड एसएससी नावाची ही कार जगातील सर्वात वेगवान कार आहे. विंग कमांडर अँडी ग्रीन यांनी विमानतळाच्या रनवेवर या कारची यशस्वी चाचणी घेतली.

ही कार ५५ सेकंदात १ हजार मैल म्हणजे १६०९ किमीचा वेग घेऊ शकते असा दावा केला जात आहे. या कारला रोल्स राईस सिंगल ईजे २०० फायटर जेट इंजिन दिले गेले असून मागे रॉकेटही दिले गेले आहे. या रॉकेटमुळे स्पीड घेताना कारला पॉवर मिळते. सुपररचार्ज्ड जग्वार व्ही एट इंजिन रॉकेट मोटरसह, हायटेक फ्यूएलवर चालणार्‍या या कारची बॉडी मल्टीपल कार्बन फायबरपासून बनविली गेली आहे. यामुळे चालकाला पूर्णपणे सुरक्षितता मिळते. या कारचा वेग फॉर्म्युला वन कारपेक्षा पाचपट अधिक आहे

या कारच्या चाचण्या सर्वप्रथम अफ्रिकेच्या वाळवंटात घेतल्या जाणार होत्या. मात्र रॉकेटमध्ये कांही गडबड झाल्याने त्या घेतल्या गेल्या नाहीत. या कारच्या आणखी कांही चाचण्या २०१८ मध्ये घेतल्या जाणार आहेत व त्यानंतर तिचा टॉप स्पीड ठरविला जाणार आहे. या कारची ताकद १८० एफवन कार इतकी म्हणजे १,३५,००० हॉर्सपॉवर इतकी असून तिची लांबी आहे १३.५ मीटर. या कारच्या परफॉर्मन्स नोंदी घेण्यासाठी ५०० सेन्सर बसविले गेले आहेत.

Leave a Comment