तुम्हाला माहिती आहे का बिस्किटांवर छिद्र का असतात ?


बिस्किट हा खाद्यपदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण खातात. काहीजण नुसते बिस्किट खातात तर कुणाला चहामध्ये बुडवून बिस्किट खायला आवडते. बिस्किटांची चव बदलत गेली आहे पण चहामध्ये बिस्किट बुडवून खाण्याची सवय लोकांमध्ये आजही पहायला मिळते. सकाळी भारतातील बहुतांश लोक हे चहासोबत बिस्किट खाणे पसंद करतात.

अनेकजण थोडीशी भूक लागलेली असो किंवा काही गोड खाण्याचे मन करत असले तर स्वस्तात मस्त पर्याय म्हणून बिस्किटाचीच निवड करतात. लोक १४व्या शतकापासून बिस्किट खात आहेत. पण याच बिस्किटांवर छिद्र (होल) का असतात हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? याचा तुम्हीही कधी विचार केला नसेल. पण काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, बिस्किटांवर बारीक छिद्र (होल) नेमके कशासाठी असतात.

आजच्या घडीला प्रत्येकजण बिस्किट खातो, पण या बिस्किटांवर छिद्र का असतात याची माहिती फारच कमी लोकांना आहे. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात काही माहिती सांगणार आहोत. खर म्हणजे बिस्किटांचा आकार हा थोडा मोठा असतो त्यामुळे ही बिस्किट सामान्यत: भट्टीत किंवा मशीनमध्ये भाजल्यास ते कच्च राहते. त्यामुळेच त्याच्यावर छिद्र करण्यात येतात ज्यामुळे बिस्किटांवर एक डिझाइनही तयार होते.

भट्टीत किंवा मशीनमध्ये छिद्र असलेले बिस्किट टाकल्यानंतर ते पूर्णपणे फुलतात आणि चांगल्याप्रकारे भाजले जातात. ही बिस्किट चांगल्याप्रकारे भाजल्यानंतर ते भट्टीतून बाहेर काढले जातात आणि मग त्याची पॅकिंग केले जाते. जर बिस्किटांवर छिद्र केली नाहीत तर बिस्किट भाजताना ती कच्चीच राहतात आणि त्यामुळे बिस्किटांची मजाच निघून जाते. सर्वच बिस्किटांवर छिद्र असतात असे नाही तर, काही बिस्किटांवरच छिद्र असतात. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती नक्की शेअर करा आणि इतरांपर्यंतही नक्की पोहचवा.