केंद्र सरकार व पतंजलीत १० हजार कोटींचे करार


केंद्र सरकारने बाबा रामदेव यांच्या पंतजली आयुर्वेद कंपनीबरोबर १० हजार कोटी रूपयांचे करार केले असल्याचे एएनआय न्यूज एजन्सीने म्हटले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया २०१७ मध्ये शुक्रवारी या करारांवर हस्ताक्षर करण्यात आले. यावेळी केंद्रीय खाद्य प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल व पंतजलीचे सीईओ आचार्य बाळकृष्ण उपस्थित होते.

या फूड फेस्टीव्हलसाठी ४० देशातील कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले असून त्यात पतंजली ही एकमेव भारतीय कंपनी आहे. पतंजली बरोबर केंद्र सरकारकडून करण्यात आलेला करार हा पतंजलीच्या वार्षिक उलाढाली एवढा आहे. यापूर्वीही अनेक राज्य सरकारांनी पंतजलीसह फूड पार्कमध्ये जमीन उपलब्ध करून देण्यासंदर्भातील करार केले आहेत. हरियाणा सरकारने नुकताच औषधी वृक्ष लागवडीसाठी ५३ एकर जमीन देण्याचा करार पतंजलीसोबत केला आहे.

Leave a Comment