बंद पडलेली व्हॉट्सअॅपची सेवा पूर्वपदावर


तासाभरापासून भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेले व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली होती, ती सेवा आता पूर्वपदावर आली आहे. व्हॉट्सअॅपची सेवा केवळ भारतातच नाही तर जगभरात विस्कळीत झाली होती. युजर्सकडून व्हॉट्सअॅपवरून मेसेज जात नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. व्हॉट्सअॅप सेवा बंद झाल्याचे त्यानंतर लक्षात आले. यासंदर्भातील माहिती अनेकांनी ट्विट करत दिल्यामुळे ‘#whatsappdown’ हा हॅशटॅश ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये होता. उद्यापही सेवा बंद होण्यामागचं अधिकृत कारण समजू शकले नाही.

Leave a Comment