सर्वात कमी व्याजदराने कर्ज देणारी बँक ठरली एसबीआय


देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना आनंद देणारा निर्णय नुकताच घेतला असून तो नोव्हेंबरपासून लागू झाला आहे. बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी गृहकर्जाच्या तसेच वाहन कर्जाच्या व्याजदरात ०.०५ टक्के कपात केली आहे. या कपातीमुळे स्टेट बँक देशातील सर्वात कमी दराने कर्ज पुरविणारी बँक ठरली आहे.

स्टेट बँकेचे गृहकर्जासाठीचे व्याजदर पूर्वीच्या ८.३५ वरून ८.३० वर आणले गेले आहेत तर वाहन कर्ज व्याजदर ८.७५ वरून ८.७० वर आणले गेले आहेत. स्टेट बँकेचे अनुकरण अन्य बँकांही करतील असा अंदाज व्यक्त केला जात असून स्टेट बँकेने आगामी काळात ग्राहकांसाठी अनेक फायदेशीर योजना आणण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Comment