आता पेटीएमही झाले मेसेजिंग अॅप


मुंबई : आता पेटीएमवरही तुम्ही व्हॉटस्अपचा अनुभव घेऊ शकता. कारण मेसेजिंगचे नवे फीचर पेटीएमने लाँच केले आहे. युजर्स यात मेसेजिंग अॅपद्वारे चॅट करू शकतात. आपल्या मित्रांना फोटो आणि व्हिडिओज पाठवू शकतात. ‘इनबॉक्स’ असे नाव पेटीएमने आपल्या या फीचर्सला दिले आहे.

युजर्स या फीचर्समुळे एखाद्याला पेमेंट केल्यावर ते पोहचले की नाही याबद्दल चॅट करून चौकशी करू शकतात. याबाबत माहिती देताना पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ दीपक अबॉट यांनी म्हटले आहे की, इनबॉक्स फीचर एंड्रोइड आणि आयओएसमध्ये लवकरच उपलब्ध होईल. व्हॉटस्अपला पेटीएमच्या या नव्या फीचरमुळे आव्हान आहे. पेटीएमचे २७ लाख युजर्स आहेत. ५० लाख व्यावसायिक पेटीएमवर व्यवहार करतात. व्हॉटस्अप जागतिक मेसेजिंग अॅप असून भारतातील ३० कोटी स्मार्टफोनमध्ये हे अॅप उपलब्ध आहे. या स्पर्धेत उतरण्यासाठी व्हॉटस्अपही पेमेंट सर्विस सुरू करणार आहे. ही सेवा डिसेंबरपर्यंत सुरू होईल. पेटीएमवर २०१०मध्ये मोबाइल फोनचे बिल पेमेंट करायला सुरूवात झाली.

Leave a Comment