आधार लिंक करणाऱ्या प्रवाशाला मिळणार महिन्याला १२ तिकीटे


नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने आधार लिंक केलेल्या प्रवाशांसाठी तिकीटांची मर्यादा वाढवली असून आता महिन्याला १२ तिकीटे आधार लिंक केलेल्या प्रवाशांना मिळू शकतात. ही मर्यादा आधी महिन्याला सहा ऐवढीच होती. पण रेल्वेने ही सुविधा आधार लिंक केलेल्या प्रवाशांसाठी दिली आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी २६ ऑक्टोबरपासून सुरु झाली असून ऑनलाइन बुकिंग करणा-या प्रवाशांना या निर्णयामुळे आपले आधार आयसीआरटीसी पोर्टलसोबत लिंक करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. खोटे युजर आयडी तयार करुन तिकीटे बूक करणा-या एजंट्सना रेल्वेच्या या निर्णयामुळे आळा बसेल.

कोणताही परिणाम आधार कार्ड लिंक न करणा-या प्रवाशांच्या ऑनलाइन बुकिंगवर होणार नाही हे देखील रेल्वेने स्पष्ट केले आहे. अद्यापही ते सहा तिकिटे बूक करु शकतात. तिकीटांची संख्या जर सहाच्या पुढे गेली तर युजरला आधार क्रमांक विचारला जाईल, ज्यानंतर आधार क्रमांक आयसीआरटीसी पोर्टलवर अपडेट करावा लागेल अशी माहिती अधिका-याने दिली आहे.

Leave a Comment