दिल्लीत मिळतो सर्वात जास्त पगार – जागतिक बँक


नवी दिल्ली – जागतिक बँकेच्या अहवालातून सुट्ट्या आणि इतर सुविधांचा विचार केल्यास मुंबई काम करण्यासाठी उत्तम असल्याचे समोर आले आहे. पण पगाराचा विचार केल्यास आर्थिक राजधानी मुंबईच्या पुढे दिल्ली आहे. मुंबईच्या तुलनेत जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक दिल्लीत कर्मचाऱ्यांना मिळणारा सरासरी पगार आहे.

व्यवसाय सुलभतेबद्दलचा अहवाल जागतिक बँकेने जाहीर केल्यानंतर दिल्लीतील सुपरमार्केटमध्ये काम करणाऱ्या एका कॅशियरला दर महिन्याला कमीत कमी २१७.६ अमेरिकन डॉलर म्हणजेच साधारणत: १४ हजार रुपये एवढा पगार मिळतो. तर मुंबईत एका कॅशियरला सरासरी १३४ डॉलर म्हणजेच ८ हजार ६५० रुपये पगार मिळतो. याचाच अर्थ असा की मुंबईतील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत दिल्लीतील कर्मचाऱ्यांचा ६० टक्क्यांनी पगार जास्त आहे.

पण दिल्लीत मिळणारा पगार जास्त असला, तरी तेथे मिळणाऱ्या सुट्ट्यांचे प्रमाण कमी आहे. वर्षाकाठी सरासरी १५ भरपगारी रजा दिल्लीतील कर्मचाऱ्यांना मिळतात. तर २१ भरपगारी रजा मुंबईतील कर्मचाऱ्यांना मिळतात. पण मुंबईत मिळणाऱ्या भरपगारी रजांची संख्या तरीही साओ पावलो (ब्राझील) आणि लंडन (ब्रिटन) येथील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भरपगारी रजांपेक्षा कमीच आहे. दरवर्षी साओ पावलोतील कर्मचाऱ्यांना २६, तर लंडनमधील कर्मचाऱ्यांना दरवर्षी २८ भरपगारी रजा मिळतात.

Leave a Comment