लेक्ससची ड्रायव्हरलेस कॉन्सेप्ट कार एलएस प्लस


टेायोटो मदर कंपनी असलेल्या व वेगवान स्टायलीश कार बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लेकससने टोक्यो मोटर शो २०१७ मध्ये त्यांची नवी ऑटोमेटेड ड्रायव्हिंग सिस्टीम कॉन्सेप्ट कार एलएस प्लस सादर केली आहे.याचबरोबर कंपनीने लेव्हल चार सल्फ ड्रायव्हिंग तत्रज्ञान असलेल्या कार्स बनविल्या जाणार असल्याची घोषणाही केली आहे. या कारचे सेफ्टी फिचर्स मदर कंपनी टोयोटाकडून घेतले जाणार असून ही कार २०२० साली बाजारात उतरविली जाईल असे समजते.

ही कार रस्त्यांची माहिती व आसपासची परिस्थिती अशा भक्कम डेटाचा उपयोग करून चालणार आहे. कंपनीचे जनरल मॅनेजर केन कोदुबुची म्हणाले कंपनी सेल्फ ड्रायव्हिंग कार अगोदर जपानसाठी बनवून मग दुसर्‍या बाजारात उतरवित आली आहे. आता मात्र जगातील सर्व बाजारांत आम्ही आमची उत्पादने उतरविणार आहोत. या कारचा लूक इतका देखणा व आकर्षक आहे की मोटर शो मध्ये येणार्यां चे ती प्रमुख आकर्षण बनली आहे.