आशियातील सर्वात श्रीमंत बनले मुकेश अंबानी


देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेले रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आता आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्जकडून रियल टाईम बिलीनेअर लिस्ट नुकतीच जाहीर केली गेली आहे त्यानुसार अंबानी ४२.१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक आहेत. अंबानी यांच्या संपत्तीचे मूल्य रूपयात २७,१८,२०,३३,४०,००० इतके आहे.(२७१८ अब्ज२० कोटी ३३ लाख ४० हजार रूपये) त्यांनी चीनच्या हुई का यान यांना मागे टाकून हे स्थान पटकावले आहे.

बुधवारी रिलायन्सच्या शेअरमध्ये १.२२ टक्के वाढ झाल्याने अंबानी यांची खासगी संपत्ती ४६६ दशलक्षने वाढली असल्याचे सांगितले जात आहे. चीनच्या एव्हरग्रँड अपचे चेअरमन हुई का यान यांची संपत्ती घटून ४०. ६ अब्ज डॉलर्सवर आली आहे. अंबानी जगात श्रीमंतांच्या यादीत १४ व्या स्थानावर आहेत. गेल्या महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजने सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीत मोठा नफा कमावला आहे त्यांच्या नेट प्रॉफिटमध्ये १२.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Leave a Comment