स्मार्टफोनसाठी स्वस्तात अनब्रेकेबल स्क्रिन शक्य


स्मार्टफोन हातातून निसटून पडण्याचा अनुभव प्रत्येक युजरला कधी ना कधी येतोय. अशा वेळी फोनचा स्क्रीन तडकतो किंवा फुटतो. मग त्यासाठी खिसा हलका करून स्क्रीन बदलावा लागतो. ही समस्या सोडविण्यासाठी वैज्ञानिक बरेच दिवस विविध प्रयोग करत आहेत. त्यात इंग्लंडच्या ससेक्स विद्यापीठातील वैज्ञानिकांनी यश मिळविले असून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी अनब्रेकेबल स्क्रीन तयार करण्यात यश मिळविले आहे. यामुळे आता स्क्रीनला गुरीला ग्लास प्रोटेक्शनची गरज राहणार नाही शिवाय हा स्क्रीन स्वस्तात बनू शकणार आहे.

या वैज्ञानिकांनी सिल्व्हर नॅनोवायर व ग्रॅफीन या पातळ पदार्थांचे संयुग बनवून अतिशय पातळ, मजबूत व फ्लेकिसबल पदार्थ तयार केला आहे. आत्तापर्यंतच्या स्क्रीनसाठी इडियम व टीन ऑक्साईडचा वापर केला जात होता.असा स्क्रीन बनविण्यासाठी चौरस मीटरला ३ हजार रूपयांपर्यंत खर्च येतो. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला एवढ्याच आकाराचा स्क्रीन ६०० रूपयांत बनतो असा दावा केला जात आहे.

Leave a Comment