पुण्याचा वैशिष्ठपूर्ण जुना बाजार


भारतात अनेक जुने अथवा चोरबाजार आहेत. त्यातील कांही वैशिष्ठपूर्णही आहेत. मात्र पुण्यात दर बुधवारी व रविवारी भरणारा जुना बाजार हा आणखी खास आहे कारण येथे राजघराण्यांशी संबंधित अनेक वस्तू अगदी स्वस्तात मिळू शकतात. हा बाजार अँटीकसाठी प्रसिद्ध आहे व त्यामुळे अँटीक वस्तूंमध्ये रस असलेले जाणकार येथे आवर्जून आढळतात.


तसे या बाजारात कपड्यांपासून ते सुर्‍या चाकूपर्यंत व फर्निचर पासून प्रवासी बॅगांपर्यंत असंख्य वस्तू मिळतात. ज्यांना दुर्मिळ वस्तू जमविण्याचा शौक असतो त्यांना अशा लाखो रूपये किमतीच्या वस्तू कांही हजारात मिळू शकतात. अर्थात त्यासाठी तशी जाण असली पाहिजे व बारगेन करण्याची कलाही अवगत असली पाहिजे. जुनी नाणी, तांब्या पितळ्याच्या मूती, विविध धातूंच्या वस्तू, जुने टेलिस्कोप, जुने कॅमेरे, घड्याळे येथे सहज मिळतील .तसेच चाकू सुर्‍यांचेही अनेक प्रकार पाहायला मिळतील. सकाळी ९ ते सायंकाळी ७ अशी या बाजाराची वेळ असते. खरेाखरच कांही खरेदी करायची असेल तर सकाळी गर्दी कमी असताना जाणे केव्हाही शहाणपणाचे.

Leave a Comment